MVA On Eknath Shinde & Devendra Fadnavis | मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांवर मविआचे गंभीर आरोप; म्हणाले – ‘हा तर रडीचा डाव’

मुंबई: MVA On Eknath Shinde & Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप रडीचा खेळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केला आहे. महाविकास आघाडीची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ज्या मतदार संघात लोकसभेला महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले तिथल्या मतदार याद्यांमधील नावे वगळण्याचा धडाका लावला जात आहेत. प्रत्येक मतदार संघातून दोन हजार ते दहा हजार मतदारांची नावं ही वगळली जात आहेत. ही सर्व नावे आघाडीचे मतदार असल्याचेही समोर आले आहे.
त्याचे पुरावेच महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. या मागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
नाना पटोले म्हणाले, ” सरकार आणि साधनांचा चुकीचा वापर सध्या केला जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारीही सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. राज्यात भाजप हरणार आहे. हे भाजपसह त्यांच्या मित्र पक्षांनाही माहिती आहे. त्यामुळे सध्या रडीचा डाव खेळला जात आहे. जर दम असेल तर आमने- सामने लढा “,असे आव्हान पटोले यांनी केले आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा
Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’