Bombay High Court On Govt Advt | सरकारी जाहिरातींवरून हायकोर्टाचे ताशेरे; जाहिरातींसाठी सार्वजनिक निधींची उधळपट्टी रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश

Mumbai High Court | Even if Sarpanch becomes 'administrator', there are limits; Mumbai High Court's big decision regarding 14,500 Gram Panchayats

मुंबई : Bombay High Court On Govt Advt | सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधींचा वापर होऊ नये यासाठी समितीची स्थापना करावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा करत एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले आहेत.

एडिटर्स फोरमने दाखल केलेल्या जनहित याचिकेत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय तसेच सरकारी संस्थांमार्फत होणाऱ्या कामांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करावे अशीही मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाकडून असे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा वृत्तपत्रातील सरकारी जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जनहित याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला असे निर्देश दिले आहेत. तसेच तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश देखील राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

जाहिरातींसाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून समितीची पुनर्रचना करून ती पुन्हा सक्रिय करण्याचेही आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

२०१५ मध्ये देखील अशा प्रकरणांना चाप बसवण्यासाठी त्रिसदस्यीय समितीच्या स्थापनेचे आदेश देण्यात आले होते.
तसेच एप्रिल २०१६ मध्येही पुनरुच्चार करण्यात आला होता. त्यामुळे, राज्य सरकारने लवकरात लवकर
या त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. (Bombay High Court On Govt Advt)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed