Maval Assembly Election 2024 | बाळासाहेब नेवाळेंचा भाजपला रामराम; मावळात राजकीय समीकरण बदलत असताना भाजपला आणखी एक धक्का

Pune PMC News | Some BJP corporators show apathy towards the education of underprivileged children; proposal to fund the Akanksha Foundation which has been providing quality education for 19 years rejected.

मावळ : Maval Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मावळात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आलेले बाळासाहेब नेवाळे (Balasaheb Newale) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत असताना नेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्ष देखील होते. शेतकरी वर्ग त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे.

नेवाळे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीतीत एका जाहीर सभेत नेवाळे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्य सहकार आघाडी सहसंयोजक पदी नियुक्त केले होते. (Maval Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed