Vadgaon Sheri Assembly Election 2024 | बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ खराडी आणि चंदननगर परिसरात पदयात्रा, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी मतदारांना प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला आहे. ते थेट मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
मतदारसंघातील प्रत्येक भागातून ते पदयात्रा काढत आहेत. पठारे यांच्या प्रचारार्थ खराडी आणि चंदननगर परिसरात गुरुवारी (दि.०७) पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांसह महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
प्रत्यक्ष भेटीगाठी घेत असताना पठारे यांचे महिला भगिनींकडून औक्षण करून त्यांचे स्वागत केले जात आहे. पदयात्रेत बापूसाहेब पठारे यांनी सर्व स्तरातील मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.
पदयात्रेदरम्यान मतदार संघातील असलेल्या समस्यांचा पाढा नागरिक पठारे यांच्या समोर वाचत आहेत. त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पठारे यांच्याकडून दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश
Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग
hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’
Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल