Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील मविआच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा जाहीर पाठिंबा
पुणे : Parvati Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. सभा, बैठका, पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम (Ashwini Nitin Kadam), महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा अश्विनी कदम यांना फायदा होणार आहे.
अश्विनी कदम म्हणाल्या, “पर्वतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव (Baba Adhav)
यांनी दिलेल्या जाहीर पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे. या पाठिंब्याने नक्कीच बळ वाढलं आहे”,
अशी भावना अश्विनी कदम यांनी बोलून दाखवली. (Parvati Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”