Gold Silver Rate Today | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी, चांदीही वाढली; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : Gold Silver Rate Today | हिंदू धर्मातील नववर्षाचा सण गुढीपाडवा दोन दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी अनेकजण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. दरम्यान, सोन्याच्या दरात सलग दुसर्या दिवशी मोठी वाढ झाली आहे.
आठवड्याच्या सुरुवातीलाच किमतीत वाढ होण्यास ब्रेक लागला होता. आता पाडव्याच्या निमित्ताने सोने पुन्हा 90 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी सोने अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी सोने 110 रुपयांनी, तर गुरूवारी 440 रुपयांनी असे एकूण 550 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,500 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान, चांदीच्या किमती सोमवार, मंगळवारी दोन दिवस स्थिर होत्या. बुधवारी चांदीच्या दरात 1000 रूपयांची वाढ झाली. तर गुरुवारी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे. (Gold Silver Rate Today)
घरबसल्या किमती जाणून घ्या
सोने-चांदीच्या किमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किमती जाहीर केल्या जातात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.