Pune Crime News | पाळीव कुत्र्यासह जर्मनीला नेण्याचे दाखविले आमिष; लग्न करुन पती एकटाच गेला जर्मनीला

crime seen

पुणे : Pune Crime News | लग्न झाल्यानंतर पाळीव कुत्र्यासह तुला जर्मनीला घेऊन जाईन, असे आमिष दाखवून लग्न केले. परंतु, तिच्या पासपोर्टला जाणीवपूर्वक उशीर होईल, असे कृत्य करुन तिला जर्मनीला न नेता फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ३२ वर्षाच्या विवाहितेने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या ३९ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २६ डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे पाळीव कुत्र्या रुडी आहे. त्याला सोडून त्या जात नाही. त्यांच्या पतीने फिर्यादी यांना खोटे बोलून त्यांना व त्यांचा पाळीव कुत्रा रुडी या दोघांना लग्न झाल्यानंतर जर्मनीला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. फिर्यादींशी लग्न केले असून त्यांचा व्हिसा येण्यास उशीर व्हावा, म्हणून त्याने विवाह नोंदणी कार्यालयात त्याचा चुकीचा पत्ता दिला. त्यामुळे फिर्यादीचा व्हिसा वेळेत आला नाही. त्यांच्या भूतकाळातील गोष्टींचा वारंवार विषय काढून फिर्यादीचे चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीशी वारंवार भांडणे करु लागला. त्यांना अत्यंत क्रुर शारीरीक व मानसिक छळ करुन खोटे आश्वासन देऊन विवाह करण्यास भाग पाडले. त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खोटे सांगून फिर्यादी यांना जर्मनी येथे न नेता त्याने फिर्यादीची व त्यांचे परिवाराची फसवणूक केली. लष्कर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed