Gold Silver Price Today | सोन्या-चांदीने महागाईची उभारली गुढी; सोने 90 हजार पार, चांदी 1 लाख 5 हजारांच्या पुढे, जाणून घ्या आजचा दर

मुंबई : Gold Silver Price Today | आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तीन दिवस दरात वाढ होताना दिसते. सोन्याच्या दरात 1600 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर चांदी एक लाख 5 हजारांच्या पुढे गेली आहे.
बुधवारी (ता. 26) सोने 110, गुरूवारी (ता. 27) 440 आणि शुक्रवारी (ता. 28) 1140 रुपये असे एकूम 1690 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी (ता. 29) 22 कॅरेट सोने 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (Indian Bullions And Jewelers Association) 24 कॅरेट सोने 89,164, 23 कॅरेट 88,807, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,892 रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीवर कोणताही कर, शुल्क नसते. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने दरात फरक दिसून येतो.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोने-चांदीचे दर घरबसल्या जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किमतीत फरक दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे दर जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.