Nanded Crime News | विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; FIR दाखल होताच मुख्याध्यापकांनी संपवले आयुष्य

poision

नांदेड : Nanded Crime News | नांदेड येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर एका मुख्याध्यापकाने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली आहे. नांदेडच्या खासगी शाळेत ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड मधील खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. त्यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबातील नातेवाइकांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष पित आपले आयुष्य संपवले. याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.

You may have missed