Rape Case On Shivalik Sharma | मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप

Shivalik Sharma

राजस्थान: Rape Case On Shivalik Sharma | इंडियन प्रीमियर लीगचा क्रिकेटर शिवालिक शर्माविरोधात लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत जोधपूरच्या कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेची मेडिकल टेस्ट झाली असून कोर्टात जबाबही नोंदवण्यात आला आहे. (Mumbai Indians)

अधिक माहितीनुसार, तरुणी फेब्रुवारी २०२३ मध्ये बडोद्यात फिरायला गेली होती. तेव्हा तिची ओळख शिवालिकशी झाली आणि दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांशी फोनवरून संवाद साधू लागले. त्यांच्यातील जवळीकपणा वाढू लागला. शिवालिकचे आई-वडिल ऑगस्ट २०२३ मध्ये जोधपूरला आले होते. त्यानंतर कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचा साखरपुडा पार पडला. शिवालिक पुन्हा जोधपूरला आला तेव्हा त्यांच्यात शारिरीक संबंध झाले.

राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी दोघे फिरायला गेले. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडितेला गुजरातला बोलावले. तेव्हा शिवालिकच्या आई-वडिलांनी म्हटलं की तो क्रिकेटर आहे. हे लग्न होऊ शकत नाही. त्याला दुसऱ्या ठिकाणाहून मागणी येत आहेत. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. कुडी भगतासनी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. शिवालिक शर्मा गुजरात येथील बडोद्याचा रहिवासी आहे. २०२४ मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सामील होता. तसेच शिवालिक रणजी ट्रॉफी बडोद्यासाठी खेळला आहे.

You may have missed