Pune Shirur Crime News | पुणे: कौटुंबिक त्रासाला कंटाळून महिलेने दोन चिमुकल्यांसह संपवले जीवन; चार महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी, पती अटकेत

Pune Shirur Crime News | Pune: Tired of family troubles, woman ends life with two toddlers; Jumps into well with four-month-old baby, husband arrested

शिक्रापूर (सचिन धुमाळ)  : Pune Shirur Crime News |  पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या चार महिन्याच्या बाळासह दोन चिमूरड्यांना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे,या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदर महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, राजू पांडुरंग जाधव असे महिलेच्या पतीचे तर अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव, सार्थक राजू जाधव व गौरी राजू जाधव असे तिघा मृतांची नावे आहे.

पाबळ ता. शिरूर येथे एका वीट भट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री जाधव व राजू जाधव या दाम्पत्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याने अहिला उर्फ भाग्यश्री ही पतीच्या त्रासाला कंटाळली होती, तर शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्यांमध्ये  सतत भांडणे होत होती, सकाळच्या सुमारास अहिला उर्फ भाग्यश्री ही तिच्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन सार्थकच्या सायकलसह घराबाहेर गेली होती, दुपार पर्यंत भाग्यश्री घरी येत नसल्याने पती राजू याने तिचा आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर दुपारच्या सुमारास घरापासून काही अंतरावावर परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीच्या कडेला सार्थकची सायकल व भाग्यश्री सह मुलांच्या चपला दिसून आल्याने राजू याने आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने विहिरीमध्ये शोध सुरू केला, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, पोलीस शिपाई विशाल देशमुख, गणेश येळवंडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने विहिरीमधील महिलेसह तिच्या दोन चिमूरड्यांचे मृतदेह बाहेर काढले.

सदर घटनेमध्ये अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव वय ३० वर्षे, सार्थक राजू जाधव वय ६ वर्षे व गौरी राजू जाधव वय चार महिने तिघे सध्या रा. पाबळ ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. बीबी ता. लोणार जि. बुलढाणा या तिघांचा मृत्यू झाला, तर घडलेल्या घटनेबाबत मयत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव वय ३५ वर्षे सध्या रा. एकेरी माळ पाबळ ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. खडकी ता. सेनगाव जि. हिंगोली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव वय ३२ वर्षे सध्या रा. एकेरी माळ पाबळ ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. खडकी ता. सेनगाव जि. हिंगोली याच्याविरुद्ध महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहे.

You may have missed