Pune Crime News | भाडे मागितल्याने सुरक्षारक्षकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with

पुणे : Pune Crime News |  शेअर रिक्षातून जात असताना रिक्षाचालकाने भाडे मागितल्यावर कसले भाडे असे म्हणून एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावर पडलेला दगड रिक्षाचालकाच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. हडपसर पोलिसांनी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) या रिक्षाचालकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भागवत गुंडप्पा वाले Bhagwat Gundappa-wale (वय २५, रा. केशव चौक माळवाडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील गाडीतळ येथे  १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर पवार हे रिक्षाचालक असून ते वैदुवाडी ते हडपसर अशी शेअर रिक्षा चालवतात. १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी वैदुवाडी चौकातून ३ प्रवासी घेतले. रिक्षा गाडीतळावरील अग्रवाल पान शॉप येथे आली. त्यातून एक प्रवासी उतरला. पवार यांनी त्याच्याकडे भाडे मागितले. तेव्हा   त्याने कसले भाडे असे म्हणाला. त्यावर पवार यांनी त्यास रिक्षाचे भाडे दे, असे म्हणाले. त्यावर तो शिवीगाळ करत बाजुला पडलेला एक दगड उचलून त्याने पवार यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. डोक्यातून रक्त येऊ लागले. तेव्हा त्यांचा मित्र लक्ष्मण शिंदे धावत आला. त्याने या प्रवाशाला पकडले व रिक्षात घालून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी भागवत गुुंडप्पा वाले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार रवींद्र मुंढे तपास करीत आहेत.

You may have missed