Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणुक करणार्या तरुणावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | एकत्र काम करीत असताना लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन फसवणूक करणार्या तरुणावर बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक रामचंद्र गोगावले Pratik Ramchandra Gogawale (रा. भुगाव, मुळ रा. गोगलवाडी, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका २७ वर्षाच्या तरुणीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी भुगाव येथील एका हॉटेलमध्ये रिस्पेशनिस्ट म्हणून काम करत होती. तिला आई वडील नसल्याने ती एकटी कोथरुडमध्ये रहात होती. हॉटेलमध्ये काम करत असताना प्रतिक गोगावले याच्याशी ओळख झाली. त्याने तू इतक्या लांब राहते, तुला येण्या जाण्याचा त्रास होत असेल, मी तुला भुगाव मध्ये फ्लॅट बघून देतो, असे सांगून त्याने भुगावामध्ये फ्लॅट पाहून दिला. कामावरुन घरी परत येताना उशीर होत असल्याने अनेकदा प्रतिक गोगावले कधी त्याच्या कारमधून तर कधी दुचाकीवर घरी सोडत असे.
जून २०२५ मध्ये त्यांनी हॉटेलमध्ये पार्टी केली. त्यावेळी त्याने आग्रह करुन बिअर पिण्यास लावली. त्यानंतर तुला जास्त झाली आहे, घरी सोडतो, असे म्हणून तो घरी घेऊन आला. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला की इथेच झोपतो. तेव्हा तिने मी येथे एकटी राहते, मला बरोबर वाटत नाही. तेव्हा त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतरही त्याने मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे बोलून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर तो अनेकदा मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे सांगून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवू लागला. फिर्यादी यांना आईवडिल नसल्याने व त्या एकट्या असल्याने तो लग्न करणार असल्याचे गृहित धरुन जोडीदार मिळेल, या उद्देशाने त्या प्रतिकशी बोलू लागल्या. काही दिवस तो तिच्या फ्लटवर राहु लागला. लग्नाबाबत विचारल्यावर घरी सांगितले आहे, असे सांगत होता.
तिने विरोध केल्यावर शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन फोटो व्हायरल करुन बदनामी करीन, अशी धमकी देऊ लागला. डिसेंबर २०२५ पर्यंत दोघे तिच्या फ्लॅटवर एकत्र रहात होते. लग्नाबाबत विचारल्यावर उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने मी विचार करुन तुला लग्नाबाबत सांगतो, असे सांगितले. ३१ डिसेंबर २०२५ नंतर त्याने तिच्याकडे राहण्यास येणे बंद केले. कामावर देखील तो अधून मधून येऊ लागला. त्याला फोन केल्यावर तो फोन उचलत नव्हता. काही दिवसांनी तिने प्रतिकला लग्नाबद्दल विचारल्यावर त्याने तुझ्याशी लग्न करायचे नाही, मला मुलीचे घरचे श्रीमंत हवे आहेत, त्याच मुलीशी लग्न करणार आहे, असे बोलून लग्नास नकार दिला. त्यानंतर या तरुणीने बावधन पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शितल गिरी तपास करीत आहेत.
