Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभाग प्रमुखपदी राजेश बनकर; भवन रचना बिपीन शिंदे यांच्याकडे
पुणे : Pune PMC News | महापालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिकेतील विविध प्रमुख विभागातील विभाग प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पथ, भवन रचना, बांधकाम आणि मलनिस्सारण विभागाच्या अधिकार्यांचा समावेश आहे.
वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची पदोन्नतीने नियुक्ती यापुर्वीच करण्यात आली. आज पावसकर यांनी शहर अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. यामुळे रिक्त झालेल्या पथ विभागाच्या प्रमुखपदी सेवा ज्येष्ठतेने राजेश बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. बनकर हे त्याअगोदर बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता होते. त्यांच्या या पदावर प्रवीण शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. भवन विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता रोहीदास गव्हाण यांची मलनिस्सारण विभागात अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली तर मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांची भवन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
