Bapu Pathare MLA | जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत वाघोलीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी व लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांची ठोस भूमिका
पुणे: Bapu Pathare MLA | पुणे विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
वाघोली व परिसरातील १० गावांमध्ये असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याबाबत बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच लोहगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक ऑक्सिजन पाईपलाईन उभारण्याची गरज अधोरेखित करत जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) मधून ६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली.
“मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याकडे या मागण्या मांडल्या असून वाघोली परिसराच्या पाणीपुरवठा योजनेला तसेच लोहगाव उपजिल्हा रुग्णालयातील आधुनिक ऑक्सिजन पाईपलाईन प्रकल्पाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल”, असा ठाम विश्वास आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.
