Pune Crime News | पुणे: वडगाव शेरीत 26 वर्षीय तरुणाला अटक, देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  वडगाव शेरी परिसरात पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक २ ने प्रथमेश ऊर्फ दाद्या धनंजय जाधव Prathamesh alias Dadya Dhananjay Jadhav (वय २६, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.

खंडणीविरोधी पथक परिमंडळ सातच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना जाधवकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. घराजवळील झुडपात लपवलेल्या पिशवीतून पोलिसांनी पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.

परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याचे जाधवने चौकशीत सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि पथकातील खरात, घावटे, कुसाळकर व वाघमारे यांनी ही कारवाई केली.

You may have missed