Pune Traffic Updates | अमित शहा यांच्या दौर्‍यामुळे शहरात वाहतूक निर्बंध; अनेक रस्त्यावरील पार्किंग दोन दिवस बंद, काही रस्ते बंद

Pune Traffic Updates

पुणे : Pune Traffic Updates | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी व सोमवारी पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौर्‍यानिमित्त रविवारी (१५ नोव्हेंबर) आणि सोमवारी(१६ नोव्हेंबर) वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहाँगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरु मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.

सोमवारी (१६ नोव्हेंबर) अमित शहा यांचा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १६  नोव्हेंबर   रोजी सकाळी ९ वाजेपासून भारत इतिहास मंडळ येथील कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रोड ते साहित्य परिषद ते बादशाही चौक ते पेरुगेट चौकी ते पावन मारुती मंदिर ते भरत नाट्य मंदीर ते इतिहास मंडळ मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते कार्यक्रम संपेपर्यंत आवश्यकतेनुसार किराड चौक ते नेहरु मेमोरियल हॉल चौक पर्यंतचा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहनांनी किराड चौक येथून जी पी ओ मार्गे किंवा ब्लु नाईल हॉटेल चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.

दारोबजी मॉल ते ब्लु नाईल चौक पर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी येणार्‍या मान्यवरांच्या वाहनांसाठी एच जी ए मॉल पार्किंग, पुना क्लब, लेडिज क्लब, किराड चौक ते एस बी आय लेन व इस्कॉन मंदिर ते ब्लु नाईल चौक या दरम्यान पार्किंग देण्यात आले आहे.

You may have missed