Pune Crime News | हडपसरमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन पोलीस आयुक्तांनी केले स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | चोरी, खुनाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Police MPDA Action)
गणेश बबन लोंढे Ganesh Baban Londhe (वय २५, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, सध्या रा. पांढरे मळा, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
गणेश लोंढे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, वानवडीमध्ये पोक्सो तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारासह आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.
गणेश लोंढे हा वारंवार गुन्हे करुन समाजासाठी धोकादायक व्यक्ती बनला होता. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन त्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव काळेपडळ पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गणेश लोंढे याच्यावर एमपीडीए कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप राऊत, हवालदार अंकुश माने, राजेंद्र वाघमारे, दाऊद सय्यद, अमोल फडतरे, पोलीस अंमलदार प्रदिप बेडीस्कर, निलेश परदेशी यांनी केली आहे.
