Pune Crime News | बसमध्ये मध्यरात्री महिलेचा विनयभंग करणार्‍यावर तात्काळ कारवाई; हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक करुन दोषारोपपत्र केले दाखल

Pune Crime News | Immediate action against the man who molested a woman in a bus at midnight; Hadapsar police arrested him within 24 hours and filed a chargesheet

पुणे : Pune Crime News | हैद्राबादवरुन खासगी ट्रॅव्हल्सने पुण्यात येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा विनयभंग करणार्‍या नराधमाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर २४ तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

निशीतकुमार यशवंतसिंग (वय ४७, रा. अपना घर सोसायटी, मिरा रोड, मुंबई) असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना हैद्राबाद ते पुणे दरम्यान प्रवासात १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडला.

फिर्यादी महिला आपल्या पतीसह गणेश ट्रॅव्हल्स या खासगी बसने हैद्राबाद येथील काचीगुडा येथून पुण्यात स्लीपर सीटवर प्रवास करत होत्या. याच बसमधील निशीतकुमार सिंग याने प्रवासादरम्यान वारंवार पीडितेच्या अंगास स्पर्श करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी तपास केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. पीडितेकडील मोबाईलमध्ये घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण असल्याने या व्हिडिओ पुरावा पेनड्राईव्हमध्ये उतरवुन जप्त करण्यात आला. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. ट्रॅव्हल्समधील प्रवासी यादीही प्राप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीला १० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. हडपसर पोलिसांनी २४ तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनिलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार व विनोद शिर्के यांनी केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक हसिना शिकलगार यांचा महिलांना न्याय देण्याची कायम भूमिका राहिली आहे. महिलांच्या विनयभंग प्रकरणात आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध २४ तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याची ही पाचवी वेळ आहे.

तरुणाला कालव्यात मृतदेह आढळून आला होता. प्रत्यक्षात तो पाण्यात बुडून मृत्यु झाला नव्हता, तर पट्टीच्या पोहणार्‍या तरुणावर वार करुन त्याला कालव्यात ढकलून देऊन मारण्यात आल्याचे निष्पन्न करुन खुनाचा गुन्हा हसीना शिकलगार यांनी उघडकीस आणला होता.

You may have missed