Pune Crime News | हॉर्न वाजवु नको, असे सांगितल्याच्या कारणावरुन बुलेट चालकासह साथीदारांनी ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी केली मारहाण, महर्षीनगरमधील घटना

Pune Crime News | Thugs tried to kill brother, future groom by beating them up over sister's marriage

पुणे : Pune Crime News | सोसायटीच्या आवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने हॉर्न वाजवु नको, असे सांगितल्याने बुलेटचालक व त्याच्या साथीदाराने ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी तसेच बॅटने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे़

याबाबत महर्षीनगरमध्ये राहणार्‍या एका ५९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बुलेटचालक व त्याच्या ७ते ८ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महर्षीनगरमधील न्यू कॉमन वेल्थ सोसायटी बिल्डिंग येथे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.

बुलेटला बसविण्यात आलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍या सुमारे १५० बुलेट चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या बुलेटचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरने नष्ट केले. बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत विरुद्ध दिशेने जाणारे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट जाणाऱ्या  दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतरही बुलेटचालकांचा त्रास काही संपण्याचे नाव घेत नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महर्षीनगर येथील न्यू कॉमन वेल्थ सोसायटीमध्ये एक बुलेटचालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आला. त्याने जोरात बुलेटचा हॉर्न वाजविला. बुलेटचा कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बुलेट चालक ७ ते ८ साथीदारांना घेऊन सोसायटीच्या आवारात आला. त्याने हाच तो मला बोलणारा, असे म्हणून ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

You may have missed