Pune Crime News । बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार, कोथरुडमधील महाविद्यालयाच्या परिसरातील घटना

crime

पुणे : Pune Crime News । बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यांवर जुन्या भांडणाच्या कारणावरुन तिघा अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणार्‍या एका १७ वर्षाच्या मुलाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कोथरुडमधील यशवंतराव मोहोळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. फिर्यादी युवक हा बारावीचा पेपर देऊन महाविद्यालयातून दुपारी बाहेर पडला. त्यावेळी तिघा युवकांनी त्याला अडविले. त्याच्याशी भांडणे काढून शिवीगाळ केली. एकाने फिर्यादीचे डोक्यात कोयता उलटा मारुन जखमी केले. इतर दोघांनी हाताने मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. आरोपींकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.

You may have missed