Pune Crime News | उसने घेतलेले 1 हजार रुपये परत देण्यावरुन तिघांनी तरुणाच्या डोक्यात दगड मारुन केले जखमी; हडपसरमधील हॉटेल मावळा समोरील घटना

Pune Crime News | Cab driver injured by throwing beer bottle at his head on suspicion of knowing about missing man's wife

पुणे : Pune Crime News | उसने घेतलेले १ हजार रुपये परत देण्यावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या भावाच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले.

याबाबत किरण बालाजी गोरे (वय २५, रा. रासगे आळी, हडपसरगाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिगंबर नागनाथ बिराजदार (रा. खंडोबा माळ, फुरसुंगी), विकास बिराजदार (रा. भूमकर चौक, वाकड) आणि विनोद मरगुती (रा. शेवाळवाडी फुरसुंगी फाटा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसर येथील डि पी रोडवरील मावळा हॉटेलसमोर २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण गोरे हे मगरपट्टा येथील एका कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीला आहेत. त्यांचे मित्र दिगंबर बिराजदार यांच्याकडून त्यांनी १ हजार रुपये खर्चासाठी उसने घेतले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांची मावळा हॉटेलसमोर दिगंबर बिराजदार, विनोद परगुती आणि विकास बिराजदार यांची भेट झाली. दिगंबर याने त्यांच्याकडे पैशांविषयी विचारणा केली. तेव्हा त्यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत नंतर बघु, असे सांगितल्याने दिगंबर याने वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता दिगंबर यांनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तेव्हा त्यांनी त्यांचा मोठा भाऊ राम  गोरे याला कॉल करुन बोलावून घेतले. राम याने त्यांच्यात मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिघेही जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पुन्हा दोघा भावांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. दिगंबर याने तेथे पडलेले लाकडी दांडके उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. विकास याने जवळच पडलेला दगड उचलून राम यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सांगळे तपास करीत आहेत.

You may have missed