Pune Crime News | न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षण घेतलेला आय टी इंजिनिअर महाविद्यालयीन तरुणींकडे पाहून करत होता विकृत चाळे, शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड
पुणे : Pune Crime News | न्यूयॉर्क येथे उच्च शिक्षण झालेला आणि आय टी कंपनीत नोकरी करीत असलेला तरुणाला विकृत सवय लागली. तो कारमध्ये बसून महाविद्यालयीन तरुणींकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करत होता. गेले पाच महिने त्याचे हे विकृत चाळे सुरु होते. महाविद्यालयीन तरुणींना दोन दिवसांपूर्वी त्याचे हे अश्लिल कृत्य लक्षात आले. शिवाजीनगर पोलिसांकडे याची तक्रार येताच पोलिसांनी या विकृत तरुणाला अटक केली.
प्रणव केदार वझे Pranav Kedar Vaze (वय २८, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे या विकृत तरुणाचे नाव आहे. हा प्रकार शिवाजीनगरमधील एका महाविद्यालयासमोर ऑक्टोंबर २०२५ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझे हा एका महाविद्यालयाच्या परिसरात कारमधून येऊन थांबायचा. तेथून जाणार्या तरुणींकडे पाहून तो अश्लील कृत्य करायचा. गेले काही महिन्यांपासून तो कार रस्त्याच्या कडेला लावत असे. कारमध्ये बसून सार्वजनिक ठिकाणी त्याने घातलेली पॅन्ट ही गुडघ्यापर्यंत खाली काढून समोर मोबाईल धरुन येणार्या जाणार्या महाविद्यालयीन तरुणींकडे पहात अश्लिल चाळे करत होता. ऑक्टोंबरपासून महाविद्यालयीन तरुणी ही कार थांबलेली पहात असत. परंतु, इतके दिवस त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. ४ मार्च रोजी दुपारी पाऊण वाजता तेथून जाणार्या तरुणींच्या प्रणव वझे याचे अश्लिल चाळे लक्षात आले. त्यांनी महाविद्यालयातील महिला संचालकांकडे तक्रार केली. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दिली. पोलिसांनी प्रणव वझे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
प्रणव वझे याचे न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षण झाले असून तो एका आय टी कंपनीत नोकरीला आहे. प्रणव हा एका निवृत्त अधिकार्याचा मुलगा आहे. पोलीस उपनिरीक्षक वलसे तपास करत आहेत.
