Pune Crime News | डिजिटल अरेस्टरद्वारे ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटींची फसवणुक करणार्‍या टोळीतील आणखी एका आरोपीला सोलापूरातून केले जेरबंद, तब्बल 5 हजार 436 बँक खात्यातून फिरले पैसे

Pune Crime News | Another accused in the gang that cheated a senior citizen of Rs. 11.5 crore through digital arrestor was arrested from Solapur, money was diverted from as many as 5 thousand 436 bank accounts

पुणे : Pune Crime News | डिजिटल अरेस्टरच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या टोळीतील आणखी एकाला सोलापूरमधून पकडण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीतील १० कोटी ७४ लाख रुपये हे वेगवेगळ्या ५ हजार ४३६ बँकांमध्ये फिरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अमर शिवाजी अत्तरगी Amar Shivaji Attargi (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात अगोदर हर्षद सुभाष धनतोले Harshad Subhash Dhantole (रा. कर्वेनगर) आणि समर्थ सुरेश देशमुख Samarth Suresh Deshmukh (वय २४, रा. कर्वेनगर) यांना २२ फेब्रुवारी अटक करण्यात आली होती. फिर्यादी यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी ७५ लाख रुपये येस बँकेच्या खात्यावर भरले होते. या खात्यावरुन महाराष्ट्र बँकेच्या ३ वेगवेगळ्या खात्यावर एकूण ६ लाख ५० हजार रुपये पाठविण्यात आले होते. सायबर क्राईम पोर्टल द्वारे प्राप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. हर्षद धनतोले याने ए टीएममधून काढलेली रोख रक्कम रोहन जाधव (रा. सांगवी) याला दिल्याचे सांगितले होते. या दोन आरोपींनी वापर केलेल्या बँक खात्याद्वारे एकूण २९ फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

रोहन जाधव याचा शोध घेत असताना त्याचा व अमर अत्तरंंगी याचे घनिष्ट संबंध असल्याचे दिसून आले. फिर्यादी यांनी फसवणुकी झालेल्या रक्कमेपैकी ५ लाख रुपये सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठविण्याचे व त्यानंतर हे पैसे चेकद्वारे कॅश विड्रॉल केल्याचे दिसून आले. हे बँक खाते अमर अत्तरंगी याच्या नावे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर ५ मार्च रोजी त्याच्या शोधासाठी सोलापूरला पथक पाठविण्यात आले. पोलिसांनी मोदीखाना परिसरातून अमर अत्तरंगी याला पकडून ६ मार्च रोजी अटक केली. अमर अत्तरंगी याच्या तपासात महाराष्ट्रातील १ गुन्हा उघडकीस आलेला आहे.

या गुन्ह्यातील १० कोटी ७४ लाख रुपयांपैकी आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सर्व पैसे एकूण ५ हजार ४३६ विविध बँकांमधील खात्यात ट्रान्सफर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार भडेकर, साळवे, पोलीस अंमलदार भोसले, राठोड, मांढरे यांनी केली आहे.

You may have missed