Pune City Police Recruitment | पुणे शहर पोलीस भरतीतील लेखी परीक्षा रविवारी 22 मार्च रोजी 6 परिक्षा केंद्रावर होणार, तब्बल 20 हजार उमेदवार देणार परीक्षा

Pune City Police Recruitment | The written exam for Pune City Police Recruitment will be held on Sunday, March 22 at 6 exam centers, as many as 20 thousand candidates will appear for the exam.

पुणे : Pune City Police Recruitment | पुणे शहर पोलीस दलातील काँस्टेबल पदासाठी होणार्‍या भरतीमधील ८८ हजार १२५ उमेदवारांची शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. तिची गुणवत्ता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली असून या उमेदवारांची लेखी परिक्षा येत्या २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहरातील ६ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला येताना उमेदवारांनी महा आयटीकडून ऑनलाईन प्राप्त झालेले मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र व लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र व ४ रंगीत पासपोर्ट साईज फोटो घेऊन परीक्षेच्या वेळेच्या ३ तास अगोदर म्हणजे सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, रायटींग पॅड व पेन पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ, सागर कवडे यांनी दिली आहे.

पुणे शहर पोलीस भरतीसाठी १६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत पोलीस मुख्यालय व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ रामटेकडी येथील मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ५० टक्के व त्या पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र झालेल्या एकूण २० हजार ६९ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आले होते. त्यावरील आक्षेपांचा विचार करुन कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेस पात्र झालेल्या २० हजार ६९ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांची लेखी परीक्षा २२ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.

उमेदवारांनी पोलीस शिपाई भरतीच्या अनुषंगाने सूचना अवगत करण्याकरिता पुणे शहर पोलीस संकेतस्थळ, महा आयटीचे संकेतस्थळ, नोंदणीकृत मोबाईल वरील संदेश व ई मेल नियमितपणे तपासावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांनी परीक्षेकरीता येत असताना कोणत्याही प्रकारचे स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाईस, डिजिटल नोटपॅड, नोटस, पुस्तके, ईयरफोन, हियरिंग एड डिव्हाईस, स्मार्ट आय ग्लासेस इत्यादी असे साहित्य ज्याचा कॉपी करण्यासाठी उपयोग होईल, अथवा उपयोग होऊ शकतो, असे साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. असे करणारा उमेदवार आढळून आल्यास त्यास त्याक्षणी बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येई. तसेच त्याचे विरुद्ध महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांची नावे

1) एमआयटी पीस युनिव्हर्सिटी लोणीकाळभोर पुणे.
2) सिंहगड इन्स्टिट्यूट आंबेगाव  पुणे.
3)एमआयटी पीस युनिव्हर्सिटी,कोथरूड, पुणे.
4) टी एन टी कॉलेज येवलेवाडी  पुणे.
5) आझम कॅम्पस लष्कर पुणे.
6) वाडिया कॉलेज कोरेगाव पार्क पुणे.

You may have missed