Pune Crime News | शेतात शेड उभारुन विदेशी दारुची विक्री करणार्या तिघांना पकडून पोलिसांनी 2 लाखांचा माल केला जप्त
पुणे /पिंपरी : Pune Crime News | दिघी परिसरातील शेतात पत्राचे शेड उभारुन त्यात विदेशी दारुची विक्री करणार्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पकडून तेथून २ लाख रुपयांची दारु जप्त केली आहे.
रामप्रसाद साहेबराव साळुंखे Ramprasad Sahebrao Salunkhe (वय ३३, रा. चर्होली, ता. खेड), तिलक हेमंत पटेल Tilak Hemant Patel (वय २१, रा. वापी नानी तंबाडी ता. पार्डी, जि. वलसाड, गुजरात), अनिल रामसुरत यादव Anil Ramsurat Yadav (वय २४, रा. चनद कॉलनी, वापी ता. पार्डी, जि. वलसाड, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे व अंमलदार हे दिघी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार सोमनाथ बोर्हाडे यांना बातमीदारांनी कळविले की, दाभाडे सरकार चौकाजवळील देवेंद्र तापकीर यांच्या शेतामध्ये पत्र्याची शेड उभारुन त्यात विदेशी दारुची विक्री करण्या करीता जवळ बाळगून आहेत. या बातमीनुसार पोलिसांनी चर्होली येथील शेतामध्ये सापळा लावून दारुची विक्री करणार्या तिघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या एकूण २० नग खाकी बॉक्सची व दोन पांढर्या रंगाच्या गोणीतील बाटल्यांची पाहणी केली. त्यामध्ये रॉयल चॅलेंज कंपनीचे ६ बॉक्स, इम्पेरीयल ब्ल्यु कंपनीचे ८ बॉक्स, रॉयल स्टॉग कंपनीचे ६ बॉक्स तसेच दोन पांढर्या रंगाच्या गोणीमध्ये रॉयल चॅलेंज कंपनीच्या ४०० बाटल्या, ३ मोबाईल असा २ लाख ४८० रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली. तिघांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार सोमनाथ बोर्हाडे, पोलीस अंमलदार सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, शशिकांत नांगरे, समीर काळे, निखिल फापाळे, राजकुमार इघारे यांनी केली आहे.
