Pune Crime News | 10 वर्षाच्या मुलीशी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी 66 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी एका ६६ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गोपीनाथ पांडुरंग होडे Gopinath Pandurang Hode (वय ६६, रा. हिंगणे) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिलेच्या १० वर्षांच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला. शाळेत शिकविल्या जाणार्‍या ‘बॅड टच, गुड टच’ या समुपदेशनामुळे या नराधमाच्या स्पर्शामागील वाईट भावना या मुलीला लक्षात आली. ही बाब तिने आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे तपास करत आहेत.

You may have missed