BMC Commissioner Ashwini Bhide : मेट्रो वूमन अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार

BMC Commissioner Ashwini Bhide | Metro Woman Ashwini Bhide will be the first woman commissioner of Mumbai Municipal Corporation.

मुंबई : BMC Commissioner Ashwini Bhide | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांचे नाव मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून, आज त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून, या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक पार पडली. या बैठकीत दोन नावे चर्चेत होती, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती. मात्र शेवटी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

You may have missed