Palkhi Mukkam In Pune | भवानी पेठेतील पालखी मुक्काम कायम ठेवण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

Palkhi Mukkam In Pune | Demand to continue the palanquin stay in Bhavani Peth; Representation to the Chief Minister

पुणे : Palkhi Mukkam In Pune | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज भवानी पेठेतील पारंपरिक पालखी मुक्कामाबाबत निवेदन देण्यात आले. संत परंपरेतील पवित्र पालखी सोहळ्यात मागील सुमारे ३५० वर्षांपासून सुरू असलेला भवानी पेठ येथील विठोबा मंदिरातील मुक्काम हा परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र हा मुक्काम हलविण्याच्या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच प्रशासनाने आवश्यक सुविधा आणि योग्य उपाययोजना कराव्यात, अशी विनंती करण्यात आली. तसेच भवानी पेठ येथील पारंपरिक मुक्काम कायम ठेवावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला योग्य सूचना देण्याचे आणि आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संत परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत हा ऐतिहासिक मुक्काम कायम ठेवला जावा, अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

– विशाल धनवडे (नगरसेवक), विश्वस्त : निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान

You may have missed