Gold-Silver Price Today | सोन्याचा भडका! अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्याच्या भावाने ओलांडला दीड लाखांचा टप्पा; पाहा आजचे ताजे दर

Gold

पुणे : Gold-Silver Price Today | अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती बळावली आहे, आणि याचा परिणाम सोन्याच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. बुधवारी, अक्षय्य तृतीयेच्या सणापूर्वी सराफ आणि साठेदारांनी केलेल्या ताज्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याचे दर त्यांच्या एका महिन्यातील उच्चांकावरून किंचित वर सरकले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर आता स्थिर होत आहेत; कारण पाकिस्तानमधील परिस्थितीवर मुत्सद्दी मार्गाने तोडगा निघण्याची शक्यता बाजारपेठ पडताळून पाहत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत, एप्रिलच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात झालेली मोठी घसरण पाहता, त्यानंतर आता दरांमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे.

आज १६ एप्रिल २०२६ रोजी गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.  बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,३६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४२,४१० रुपये आहे.

You may have missed