Pune Crime News | एम डी ड्रग्जची विक्री करणार्‍या दोघा गुन्हेगारांना पकडून वाघोली पोलिसांनी जप्त केला 31 लाखांचा माल

Pune Crime News | Wagholi police arrest two criminals selling MD drugs, seize goods worth Rs 31 lakh

पुणे : Pune Crime News |  एम डी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

योगेश सुभाष कणगरे Yogesh Subhash Kangare (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह Sonu Singh alias Manuvendra alias Sonu Shankar Singh (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

वाघोली पोलीस ठाण्याचे तपास पथक सातव वस्ती रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, विशाल गायकवाड यांना पाहून एक जण  घाईगडबडीत जाऊ लागला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन योगेश कणगरे याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे १ लाख ८ हजार रुपयांची ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) पावडर  मिळून आली. पोलिसांनी त्याच्या कारसह एम डी जप्त करुन योगेश कणगरे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने ही एम डी पावडर त्याचा मित्र सोनु सिंह याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोनु सिंह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४७ हजार रुपयांची ८ ग्रॅम एम डी पावडर, अ‍ॅक्टीव्हा दुचाकी, मोबाईल मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यात घराच्या पार्किंगमध्ये ऑडी कंपनीची कार होती. या कारची झडती घेतली. तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांची २३ ग्रॅम एम डी पावडर मिळाली. पोलिसांनी २० लाखांची  ऑडी  कार जप्त केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३७ ग्रॅम एम डी पावडर, मोबाईल, दोन कार, दुचाकी असा ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, पोलीस उप निरीक्षक मनोज बागल, राहुल कोळपे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे यांनी केली आहे.

You may have missed