Pune Crime News | तडीपार केला असताना बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणार्या गुंडाला बिबवेवाडी पोलिसांनी केले गजाआड
पुणे : Pune Crime News | गुंडाच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी त्याला गेल्या वर्षी २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असताना बिबवेवाडी परिसरात येऊन दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ताऊ ऊर्फ अविनाश अर्जुन जोगन Tau Alias Avinash Arjun Jogan (वय २८, रा. शेळके वस्ती, अप्पर बिबवेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी अविनाश शेळके याला १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार केले होते. असे असतानाही तो कोणाची पूर्व परवानगी न घेता तडीपारी आदेशाचा भंग करुन पुणे शहरात आला. अपर बिबवेवाडी परिसरातील शेळके वस्ती येथे १६ एप्रिल रोजी त्याने हवेत शस्त्र फिरवुन दहशत पसरवित होता. पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अविनाश जोगन हा दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक तातडीने तेथे पोहचले व त्यांनी अविनाश जोगन याला ताब्यात घेतले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमीत ताकपेरे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.
