Pune Crime News | मांजरीत टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मांजरी पोलिसांनी दोघांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | गाडीचे टायर बदलत असताना आलेल्या तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत कुणाल राहुल चौगले (वय १८, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कुणाल राहुल चौगुले Kunal Rahul Chougule (वय १८), सुरेश बाबुराव गायकवाड Suresh Baburao Gaikwad (वय १८, दोघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना सोलापूर -पुणे रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्र येथील पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणच्या फलकाजवळ २० एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश कांबळे हे महिंद्र पिकअपचे टायर बदलण्याचे काम करत होते. रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन तिघे जण आले. काही एक कारण नसताना त्यांनी कुणाल चौगुले यांच्यावर कोयत्याने डोक्यात, खांद्यावर, पाठीत वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी जखमी कुणाल चौगुले यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी चौगुले यांच्याकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे.  पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोेणे तपास करत आहेत.

You may have missed