Pune Crime News | पुणे : खुनासाठी पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी केले जेरबंद (Video)
पुणे : Pune Crime News | हॉटेलचालकांकडून खंडणी उकळण्यासाठी तसेच पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाचा बदला घेऊन खुन करणार्यासाठी पिस्तुल बाळगून असलेल्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केले आहे.
चेतन संतोष थोरे Chetan Santosh Thore (वय २३, रा. निवृत्तीनगर, वडगाव) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण, मारामारी, शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहे.
सिंहगड कॉलेज येथील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याकरीता पिस्टल आणल्याचे तो सांगतो.
नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी फाटा येथे नाकांबंदी करत असताना पोलीस अंमलदार प्रतिक ऊर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन थोरे याच्याकडे अग्निशस्त्र असून तो धायरीतील बारांगणी मळा येथे येणार आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी बारांगणी मळा येथे सापळा रचून चेतन थोरे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचे गावठी पिस्टल मिळून आले. नांदेड सिटी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस निरीक्षक अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे, दत्तात्रय सावंत राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रतिक ऊर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, निलेश खांबे, संग्राम शिनगारे, सतिश खोत, राजू वेगरे, मोहन मिसाळ, अक्षय जाधव, अनिल बारड यांनी केली आहे.
