Pune Crime News | आर्थिक वादातून नदीपात्रात तरुणाचा खुन; डेक्कन पोलिसांनी एकाला अटक करुन अल्पवयीन साथीदाराला घेतले ताब्यात

Pune Crime News | Youth murdered in river due to financial dispute; Deccan Police arrest one and take minor accomplice into custody

पुणे : Pune Crime News | डेक्कन जिमखाना परिसरातील नदी पात्रात तरुणाचा गळा चिरुन करण्यात आलेल्या खुनाचा उलगडा डेक्कन पोलिसांनी केला आहे. आर्थिक वादातून हा खुन झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी एकाला अटक केली तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

ओंकार गणेश कांबळे Omkar Ganesh Kamble (वय २७, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कुशल अरुण कसबे (वय ४२, रा. धनकवडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. नोकरी लावण्यासाठी कुशल कसबे याने ओंकार कांबळे याच्यावर ७० हजार रुपये घेतले होते. या वादातून कुशल कसबे याचा खुन केल्याचे उघडकीस आले आहे.

भिडे पुलाजवळ १९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्याजवळ वार करुन त्याचा खुन करण्यात आला होता. या मृताच्या हातील टॅटू आणि पोलिसांकडील रेकॉर्डवरुन त्याचे नाव कुशल अरुण कसबे असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातून ओंकार कांबळे व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी हा खुन केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी कसबे याचे कुटुंबीय, निकटवतीर्यांची चौकशी केली. डेक्कन जिमखाना परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार कांबळेने त्याची दुचाकी हडपसर परिसरात लावल्याची माहिती मिळाली. मनिषा ब्लिटस सोसायटी येथे ही दुचाकी मिळाली. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी डिक्की उघडली. तेव्हा डिक्कीत मोबाइल फोन  सापडले. खून केल्यानंतर आरोपी कांबळेने शर्ट बदलला होता. तो आणि त्याच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार कर्नाटकातील गदग येथे पसार होण्याच्या तयारीत असून, दोघे जण हडपसर परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कांबळेसह अल्पवयीन साथीदाराला सापळा लावून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, तसेच गुन्हे शाखेतील युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव त्यांचे पथक यांनी केली आहे.

You may have missed