Pune Crime News | दत्तवाडीत अवकाळी पावसाचा फटका; तुटलेल्या वीजतारीमुळे मायलेकी गंभीर जखमी

Pune Crime News | Unseasonal rain hits Dattawadi; Man seriously injured due to broken electric wire

पुणे : Pune Crime News |  शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे दत्तवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली. महावितरणची वीजतार तुटून घराच्या लोखंडी दरवाजावर पडल्याने आई-मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.

गौरी आणि आनंदी विनायक जाधव अशी जखमी मायलेकींची नावे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी अचानक गारांसह पावसाने हजेरी लावल्याने या भागातील वीजतारा तुटल्या. त्यापैकी एक तार गणेश जाधव यांच्या घरासमोरील लोखंडी दरवाजावर पडली.

घरात प्रवेश करताना गौरी डिसले यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्या दरवाजालाच चिकटून राहिल्या. हा प्रकार पाहून त्यांची आई आनंदी जाधव यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलीला सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसून त्या दूर फेकल्या गेल्या.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वीज यंत्रणेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

You may have missed