Two Policemen Suspended In Pune | अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेणारे सहायक फौजदार, हवालदार निलंबित; व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केली कारवाई

Pune Crime News

पुणे : Two Policemen Suspended In Pune | अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सहायक पोलीस फौजदार व पोलीस हवालदार यांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबित केले आहे.

सहायक पोलीस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड (Bapusaheb Kisanrao Khutwad) आणि पोलीस हवालदार अमोल प्रकाश पवार Amol Prakash Pawar अशी निलंबित करणार्‍यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते.

बापुसाहेब खुटवड आणि अमोल पवार हे अभिजित मारुती गायकवाड (वय ३६, रा. साईबाबा मंदिरासमोर, पर्वती दर्शन) या अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ मार्चमध्ये इन्स्ट्राग्रामवर तसेच सोशल मीडियावरील न्युज चॅनेलवर व्हायरल झाले होते. अशा प्रकार अवैध धंदेचालकाच्या प्रत्यक्ष  संपर्कात राहून त्यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाण घेवाण करणे ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीला व पोलीस दलाच्या लौकिकाला बाधा निर्माण करणारी आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे सहायक पोलीस फौजदार बापूसाहेब खुटवड, पोलीस हवालदार अमोल प्रकाश पवार यांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबित केले आहे.

You may have missed