Pune Crime News | तोल जाऊन 19 व्या मजल्यावरुन पडून बांधकाम कामगाराचा मृत्यु; वीरकर बिल्डरसह साईट सुपर वायजर, लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Construction worker dies after falling from 19th floor; Case registered against Virkar Builder, Site Supervisor, Labor Contractor

पुणे : Pune Crime News | बाणेर येथे सुरु असलेल्या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यु झाला. सुरक्षा साधने न पुरविल्याच्या कारणावरुन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक वीरकर, साईट सुपर वायजर आणि लेबर कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रागीब एहसान रकीब (वय १९, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत्युुमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत रागीब याचा भाऊ मोहमद एहसान राकीब (वय २१, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेरमधील पॅन कार्ड क्लब रोडवरील वीरकर सेव्हन साईट (Virkar Seven Site) येथे २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला.

बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोडवर वीरकर बिल्डर यांची वीरकर सेव्हन ही २४ मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. रागीब रकीब हा स्लॅबकरीता बाहेरील बाजूला लोखंडी सांगडा उभारण्याचे काम करत होता. १९ व्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात त्याचा मृत्यु झाला. रागीब याला हेल्मेट देण्यात आले होते. परंतु, इतक्या उंचावर काम करत असतानाही त्याला सेफ्टी बेल्ट व सुरक्षितेची जाळी योग्य प्रकारे लावण्यात आली नव्हती. त्यामुळे तो १९ व्या मजल्यावरुन थेट खाली जमिनीवर पडून त्याचा मृत्यु झाला. बांधकाम व्यावसायिक, साईट सुपर वायजर व लेबर कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करीत आहेत.

You may have missed