Pune Crime News | पुणे: अहिल्यानगरच्या चोरट्याकडून लक्ष्मीनगर पोलसिांनी 10 मोटारसायकल केल्या हस्तगत (Video)

Pune Crime News | Pune: Laxmi Nagar Police seize 10 motorcycles from Ahilyanagar thief (Video)

पुणे : Pune Crime News | येरवडा परिसरातील फेब्रुवारीमधील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अहिल्यानगरमध्ये पाठलाग करुन चोरट्याला पकडले. त्याच्याकडून १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/DXi6mHQiVeu/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

वृषभ संतोष भिसे Taurus Santosh Bhise (वय २३,रा. निबोडी, जि. अहिल्यानगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर अहिल्यानगरमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल आहे.

येरवडा परिसरातून २० फेब्रुवारी रोजी एक मोटारसायकल चोरीला गेली होती. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजर ओंबासे, अतुल जाधव यांनी कोणतीही माहिती नसताना घटनास्थळ व इतर ठिकाणाचे ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रिक विश्लेषण केले. स्थानिक बातमीदारांच्या बातमीवरुन आरोपी निष्पन्न केले. अहिल्यानगर येथील निंबोडी गावात सापळा रचला. पोलिसांना पाहून पळून जाणार्‍या वृषभ भिसे याला पाठलाग करुन पकडले. गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पुणे शहरातील ९ मोटारसायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी २ लाख ८० हजार रुपयांच्या एकूण १० मोटारसायकली त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक उमेश गिते, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अशोक कुंभार, सुरज ओंबासे, अतुल जाधव, भीमराव कांबळे, अमाले वायाल, कादीर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, लक्ष्मण उगले यांनी केली आहे.

You may have missed