Pune Crime News | ‘मी डोके फोडून घेतो, तुही घे’ ! पोलिसांना धक्काबुक्की करणार्यांनी पोलीस चौकीत काचेच्या दरवाजावर धडक मारुन स्वत:ला केले जखमी, आपण आत्महत्या करुन त्यात पोलिसांना गुंतवू, तरुणांनी दिली धमकी
पुणे : Pune Crime News | दोन गटात भांडणे सुरु असल्याचे समजल्यावर तेथे गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की केली. तेव्हा तिघांना पकडून पोलिसांनी पोलीस चौकीत आणले. त्यांच्यावर कारवाई करत असताना एकाने ‘‘मी डोके फोडून घेतो, तुही घे’’ असे म्हणाला. त्यावर दोघांनी काचेच्या दरवाजावर डोक्याने धडक देऊन काच फोडली. त्यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. चंदननगर पोलिसांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश हेमंत लोखंडे Avinash Hemant Lokhande (वय २४), अनिकेत हेमंत लोखंडे Aniket Hemant Lokhande (वय २७), वैभव राजू चौगुले Vaibhav Raju Chougule (वय २३, सर्व रा. गणेशननगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत पोलीस शिपाई अभिजित आल्हाट (वय २७) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव शेरीतील बदामी चौक व महात्मा फुले पोलीस चौकीमध्ये २३ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता घडला. अविनाश लोखंडे याने चला आपण आत्महत्या करु व पोलिसांची नावे टाकून त्यांना गुंतवु, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार अभिजित आल्हाट हे शिवराणा पोलीस चौकीला मार्शल आहेत. दुपारी पोलीस अंमलदार कोकाटे यांनी त्यांना फोन करुन गणेशनगर चौकात दोन गटात मारहाण चालू आहे. तुम्ही लवकर पोहचा, असे कळविले. त्यांचे सहकारी कांबळे हे जेवण करीत असल्याने ते एकटेच गणेशनगर येथील बदामी चौकात गेले. तेथे चौकशी केल्यावर भांडण करणारी मुले पळून जाऊ नये, म्हणून त्यांनी गाडीची चावी काढत घेत त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने एक जण त्यांच्या अंगावर धावून आला. ते एकटेच असल्याचे पाहून इतर जण त्यांच्या अंगावर येऊ लागले. त्यावेळी महात्मा फुले चौकीचे मार्शल यांच्या मदतीला आले. त्यांनी तिघांना पकडून पोलीस चौकीत आणले. पोलीस हवालदार मुलाणी यांच्यासमोर हजर केले.
त्यांच्याकडे चौकशी करत असताना वैभव चौगुले व अनिकेत लोखंडे हे अरेरावीची भाषा करत “तुम्हाला दाखवितो, आम्ही कोण आहोत, तुमची नोकरी घालवतो,” असे बोलले. मुलाणी हे त्यांना समजावून सांगत असताना वैभव चौगुले हा आल्हाट यांच्याशी झोंबाझोंबी करु लागला. अनिकेत लोखंडे याला म्हणाला, मी डोके फोडून घेतो व तुही डोके फोडून घे, असे म्हणून त्याने पोलीस चौकीच्या काचेच्या दरवाज्यावर स्वत:चे डोके आपटले. काचेच्या दरवाजाला धडक दिल्याने त्यात काचेचा दरवाजा फोडून त्याचे नुकसान करत स्वत:ला जखमी करुन घेतले.
त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यावर अनिकेत लोखंडे याने पोलीस चौकीमधील लाकडी टेबलावर स्वत:चे डोके आपटून घेत असताना कोकाटे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चौकीतील संगणक खाली पाडुन जोरजोरात आरडाओरडा करत होता. त्यावेळी अविनाश लोखंडे याने चला आपण आत्महत्या करु व पोलिसांची नावे टाकून त्यांना गुंतवु अशी धमकी देत आरडा ओरडा करु लागला. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करीत आहेत.
