Pune Crime News | करिअरवरुन झालेल्या वादातून तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपवले; चार महिन्यांनी प्रियकरावर गुन्हा दाखल

Pune Crime News | A young woman hanged herself over a career dispute; A case was registered against her boyfriend four months later

पुणे : Pune Crime News |  त्या दोघांचे प्रेमसंंबंध होते. ते त्यांच्या घरातील लोकांना माहिती होते, अशात त्यातील तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. चार महिन्यांनंतर मुलीचे नातेवाईक पोलिसांकडे पुरावे घेऊन आले. तिच्याशी वादविवाद करुन टेन्शन दिल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी प्रियकर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

अर्थव सदानंद कुलकर्णी Arthav Sadanand Kulkarni (वय१९, रा. कमल विहार सोसायटी, मोहननगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. साक्षी येनपुरे (वय १९) असे तरुणीचे नाव आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सव्वा पाच वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी येनपूरे आणि अर्थव कुलकर्णी हे दोघे एकाच वयाचे होते. अर्थव व साक्षी यांचे प्रेमसंबंध होते. हे त्यांच्या नातेवाईकांना माहिती होते. त्यांची त्याला संमती होती. त्या दोघांमध्ये लग्न करण्यावरुन वारंवार वादविवाद होत होते. अर्थव याचे म्हणणे होते की अगोदर करियरवर फोकस करुन त्यानंतर लग्नाचा विचार करु़. मात्र साक्षी हिला लवकर लग्न करायचे होते. त्यातून दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यातून साक्षी हिने ताण घेऊन २३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे रहात्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले की, साक्षी आणि अर्थव यांचे प्रेमसंबंध होते. साक्षी हिच्या नातेवाईकांनी गेल्या चार महिन्यात अनेक वेळा येऊन काही माहिती दिली. तिच्या आई व भावाच्या मोबाईलवरील ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी नुकतेच पोलिसांना दिले. त्याचा तपास केल्यावर तो अर्थव याचा आवाज असल्याचे लक्षात आले. त्याने टेन्शन दिल्यामुळेच साक्षीने असा टोकाचा निर्णय घेतल्याची तक्रार त्यांनी दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

You may have missed