Pune Crime News | पुणे : लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणातून निर्घुण खुन, भारती विद्यापीठ पोलिसांनी 10 तासात गुन्हेगारांना केले गजाआड (Video)

Pune Crime News | Pune: Murder resulting from a fight over dancing at a wedding procession, Bharati Vidyapeeth police nabbed the culprits in 10 hours (Video)

पुणे : वेल्हे तालुक्यात लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने कात्रजमध्ये चायनीज स्टॉल मालकाचा निर्घुण खुन केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी १० तासात चहाच्या टपरीचालकासह चौघांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DXl5YTqCUIF

विशाल दत्तात्रय खोपडे Vishal Dattatreya Khopade (वय २२), अभिषेक दिलीप खोपडे Abhishek Dilip Khopade (वय २३, दोघे रा. सच्चाईमाता, आंबेगाव), सचिन हरीचंद्र धुळे Sachin Harichandra Dhule (वय ४३, रा. कात्रज), आदिनाथ शिवाजी कसबे Adinath Shivaji Kasbe (वय १९, रा. मांगडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तेजस दत्तात्रय पिलाने Tejas Dattatreya Pilane (वय २४, रा. पार्थदर्शन सोसायटी, मोहननगर धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेजस याचा भाऊ प्रदीप मारूती पिलाने (वय २७) याने फिर्याद दिली आहे. ही घटना शिवसृष्टी गदा चौकापाासून कात्रजकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती.

आरोपी विशाल खोपडे याची चहाची टपरी आहे. तेजस पिलाणे यांचे सिंहगड कॅम्प येथे चायनीजचा स्टॉल आहे. स्टॉल बंद करुन साफसफाई झाल्यावर तेथे काम करणार्‍या थापा या कुकला घरी सोडण्यासाठी तेजस पिलाणे हे दुचाकीवरुन जात होते. शिवसृष्टी गदा चौकापासून ते पुढे आल्यावर मागून दुचाकीवर काही जण आले. त्यांनी तेजस यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी धडकवली. ते खाली पडले. हल्लेखोरांच्या हातातील कोयते पाहून मागे बसलेला थापा पळून गेला. हल्लेखोरांनी तेजस पिलाणे याच्यावर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेजस याला भारती हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मयत घोषित केले.

सर्व्हिस रोडवर घटना घडली त्या परिसरात कोणतेही सीसीटीव्ही नाहीत. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मंगेश पवार हे तपास करीत असताना त्यांची विशाल खोपडे याच्याविषयी माहिती मिळाली. तेजस याचा मावस भाऊ केतन खोपडे याचे १४ मार्च २०२६ रोजी वेल्हा तालुक्यातील कोंढावळे येथे लग्न होते. लग्नाला पुण्यातून गेलेले तेजस आणि विशाल खोपडे यांची लग्नातील वरातीत नाचण्यावरुन भांडणे झाली होती. हे समजल्यावर पोलिसांनी विशाल खोपडे व त्यांच्या साथीदारांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाऊंटची तांत्रिक विश्लेषण केले. त्यात हे आरोपी शिरवळ येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसानी शिरवळ येथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, किरण साबळे, राजेंद्र बिऱ्हामणे, विजय पोळ, गणेश भोसले, दिगंगर भोगण, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.

You may have missed