Monsoon 2026 Updates | मान्सूनबाबत मोठी बातमी! यंदा लवकर आगमन; केरळात 25 मेपर्यंत धडकण्याची शक्यता

Monsoon 2026 Updates | Big news about monsoon! Early arrival this year; Likely to hit Kerala by May 25

Monsoon 2026 Updates | राज्यातील कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे ते २५ मे दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून पोहोचण्याची शक्यता असून, त्यानंतर २५ मेपर्यंत केरळमध्ये त्याचे आगमन होईल. हिंदी महासागरातील अनुकूल परिस्थिती आणि एल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला असून, विदर्भात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. अकोल्यात तब्बल ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसत असून, मे महिन्याच्या अखेरीस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

You may have missed