Pune Crime News | पुणे : बेकायदा वास्तव्य करणार्‍या 3 बांगला देशी महिला ताब्यात; बुधवार पेठेतील 4 कुंटणखान्यांना पोलिसांनी ठोकले सील

Pune Crime News | Pune: 3 illegal Bangladeshi women arrested; Police seal 4 brothels in Budhwar Peth

पुणे : Pune Crime News |  बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणार्‍या ३ बांगला देशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  कुंटणखाना चालविण्यास जागा उपलब्ध करुन देणार्‍या ४ फ्लॅट पोलिसांनी १ वर्षांसाठी सीलबंद करण्यात आले आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन युवतींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. त्याबरोबर अन्य तीन ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी या फ्लॅटवर कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठविला होता. त्यानुसार बुधवार पेठेतील न्यू वेलकम मधील २ फ्लॅट, बेगम बिल्डिंग आणि दाणे आळी येथील वाड्यामधील एक रुम असे ४ फ्लॅट १ वर्षाकरीता सील करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगला देशी महिलांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक  प्रशांत भस्मे यांचे गोपनीय बातमीवरुन एका महिन्यांपूर्वीपासून ३ बांगला देशी महिला वास्तव्य करीत आहे. त्या बुधवार पेठ भागात रस्त्याचे कडेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन तीन महिलांना ताब्यात घेतले़ गेल्य. १ महिन्यांपासून त्या पुण्यात रहात असून त्यांच्याकडे बांगला देशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीसआयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, पूजा जाधव, पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसीम शेख, वनिता कांबळे, वनिता चौगुले यांनी केली.

You may have missed