Pune Crime News | पुणे : साडीच्या स्टेटसवरून उघड झाला चोरीचा गुन्हा; मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: Theft case revealed based on saree status; Case registered against maid

पुणे : Pune Crime News | पुण्यातील बाणेर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरकाम करत असताना साडेचौदा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये किमतीची सिल्कची साडी चोरल्याप्रकरणी एका मोलकरणीविरोधात बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, चोरलेली सिल्कची साडी मोलकरणीने एक दिवस नेसून तिचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवला. हे स्टेटस पाहून घरमालकिणीला संशय आला. तिने याबाबत विचारणा केली असता, मोलकरणीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या घरमालकिणीने तिला तात्काळ कामावरून काढून टाकले आणि नवीन कामगार ठेवला.

त्यानंतर घरात तपास करताना किचन ओट्याखाली पाण्याची बाटली, तेल तसेच इतर काही वस्तू आढळून आल्या. या वस्तू काळी जादू करण्यासाठी ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनांनंतर घरमालकिणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

You may have missed