Pune Crime News | पुणे : क्रेडिट कार्ड वसुलीसाठी भररस्त्यात बेदम मारहाण; हडपसरमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा

Pune Crime News | Pune: Brutal beating on the street for credit card recovery; Crime against three in Hadapsar

पुणे : Pune Crime News | हडपसर परिसरात क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या नावाखाली एका व्यक्तीला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघा वसुली एजंटांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सोमवारी दुपारी पुणे-सोलापूर मार्गावरील पंधरा नंबर चौकात घडली. क्रेडिट कार्ड कंपनीचे एजंट जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे यांनी संदीप जामदार यांना थकबाकी वसुलीसाठी अडवले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.

वाद वाढताच तिघांनी जामदार यांना भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने हात जोडून ‘मारू नका’ अशी विनंती केली, मात्र एजंटांनी तिचे ऐकून घेतले नाही. शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली.

या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.

You may have missed