Pune Maval Crime News | जमिनीच्या वादातून खून; 5 लाखांच्या पैशांवरून पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने खून

Pune Maval Crime News | Murder over land dispute; Nephew kills cousin with a crowbar over Rs 5 lakhs

पिंपरी : Pune Maval Crime News | मावळ तालुक्यातील जाधववाडी येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) रात्री सुमारे अकराच्या सुमारास घडली. रवींद्र रमाकांत जाधव (वय ४५, रा. जाधववाडी, ता. मावळ) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीयांची जाधववाडी येथे सुमारे एक एकर नऊ गुंठे जमीन असून, तिच्या वाटपावरून कुटुंबात वाद सुरू होता. दरम्यान, एमएसआरडीसीची पाइपलाइन या जमिनीतून गेल्यामुळे कुटुंबाला सुमारे पाच लाख रुपये मिळाले होते. या पैशांच्या वाटपावरूनही मागील काही दिवसांपासून वाद चिघळला होता.

रविवारी रात्री रवींद्र जाधव आणि त्यांचा पुतण्या विशाल सुखदेव जाधव यांच्यात पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात विशाल याने कोयत्याने रवींद्र यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी विशाल जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

You may have missed