Pune Crime News | पुणे : परवाना न घेता DJ वर चित्रपटांची गाणी वाजविल्यावरुन हॉटेल बास्टीन वर कॉपीराईट भंगाचा गुन्हा दाखल

Pune Crime News | Pune: A case of copyright infringement has been registered against Bastian Bar & Restaurant for playing movie songs on DJ without a license.

पुणे : Pune Crime News | अधिकृत परवाना न घेता विविध कंपन्यांचे स्वामीत्व हक्क असलेली चित्रपट गीते D J डी जे  वर वाजविल्याप्रकरणी हॉटेल बास्टीन हॉस्पिलिटी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नोवेक्स कम्युनिकेशन कंपनीचे एरिया मॅनेजर चेतन विरुळकर (वय ३८, रा. पिंपळे निलख) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हॉटेल बास्टीन हॉस्पिलिटी कंपनी ( Bastian Bar & Restaurant), व्यवस्थापन व इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोवेक्स कम्युनिकेशन या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ ते १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री दीड  वाजेपर्यंत तसेच २४ डिसेंबर रात्री साडेदहा ते २५ डिसेंबर २०२५ मध्यरात्री साडेबारा आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहा ते १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल बास्टीन यांच्या व्यवस्थापनाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नोवेक्स कम्युनिकेशन कंपनीकडून अधिकृत परवाना न घेता कंपनीकडील झी म्युझिक, वायएसआर, टिप्स, सारेगमा या म्युझिकल इंडस्ट्रीयल कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेल्या विविध चित्रपटातील  गाणी डी जे साऊंड बॉक्स सिस्टिम वर वाजवून कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय कांबळे पाटील तपास करीत आहेत.

You may have missed