Pune Crime News | धक्कादायक! अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी 15 आठवड्याची गर्भवती

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  एका अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी १५ आठवड्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत या मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये तसेच २१ मार्च २०२६ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन नोव्हेंबर २०२५ मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने या मुलीवर वारंवार बळजबरी करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती १५ आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.

You may have missed