Pune Crime News | पुणे : प्रॉपर्टीत हिस्सा मागणार्‍या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime News | Pune: Attempt to kill innkeeper by stabbing criminal in the head while demanding share in property

पुणे : Pune Crime News | प्रॉपर्टीमध्ये हिस्सा, पैसे द्या, असे म्हणून नातेवाईकाच्या घराची काच फोडणार्‍या मोक्कामधील सराईत गुन्हेगारावर आते भावाने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रोनक ऊर्फ टक्या आजेश चव्हाण (वय २०, रा. शेलार चाळ, गाडीतळ, येरवडा) असे जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. लक्ष्मीनगर पोलिसांनी गौतम दुष्यंत कांबळे (वय ३२, रा. शेलार चाळ, इराणी मार्केटमागे, गाडीतळ, येरवडा) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत आलोक आजेश चव्हाण (वय २७, रा. शेलार चाळ, गाडीतळ, येरवडा) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ मे रोजी पहाटे पावणेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनक चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यातून तो जामिनावर बाहेर आला आहे.

रोनक चव्हाण हा १ मे रोजी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेला. प्रॉपर्टीमध्ये हिस्सा, पैसे द्या, असे बोलला. यावरुन त्याने गौतम कांबळे यांच्याशी भांडणे केली. कांबळे यांच्या आईला मारले व त्यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली. त्या रागातून गौतम कांबळे याने रोनक याच्या डोक्यात, तोंडावर कोयत्याने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन गौतम कांबळे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करीत आहेत.

You may have missed